FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Saturday, 26 May 2018

Nippah Virus Prevention Tips in Marathi.

*ही ३ फळे चुकूनही खावू नका, होऊ शकते निपाह व्हायरसची लागण..*
संपूर्ण देशभरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिशय धोकादायक अशा ‘निपाह’ या व्हायरसमुळे केरळ राज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टिस्ट्युड ऑफ वायरॉलॉजीने ३ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ‘निपाह’ व्हायरस असल्याची घोषणा केली आहे. हा निपाह व्हायरस लाळेतून पसरत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. निपाह व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीपासून दूर रहा. तसंच प्राण्यांकडून माणसांकडेही हा व्हायरस अतिशय सहज पसरत आहे. जमीनीवर पडलेल्या फळांमधून हा व्हायरस पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

*ही 3 फळे खाणे टाळा-*
केरळमध्ये पसरलेल्या निपाह व्हायरसचा इतर ठिकाणी धोका नसला तरी केरळवरुन येणारी फळे खाणे टाळा असे आवाहन करण्यात येत आहे. फळे खाताना स्वच्छ धुवूनच खा. रमजानचा महिना सुरु आहे त्यामुळे केळी, खजूर या फळांना मोठी मागणी आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसची दहशत पाहता तेथील फळांमध्ये हा व्हायरस येऊ शकतो. केळी, खजूर आणि आंबा ही फळे खाणे टाळावे.

*निपाह व्हायरस काय आहे?*
या व्हायरसची निर्मिती अत्यंत सहज होते. प्राणी आणि माणसांमध्ये हा गंभीर आजार जन्म घेतो.हा व्हायरस खासकरून वटवागुळातुन होतो. १९९८ मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमधून या व्हायरसचा शोध लागला होता. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अंड प्रिव्हेंशन (CDC)नुसार, निपाह व्हायरसचे इंफेक्शन एंसेफ्लाइटिसशी संबंधित आहे. त्यामुळे मेंदूचे नुकसान होते.

*ही लक्षणं असतील तर काळजी घ्या-*
लागण झालेल्या व्यक्तीस ३ ते १४ दिवसांपर्यंत ताप आणि डोकेदुखी होते. नंतर २४-४८ तासांत व्यक्ती कोमात जाते. इंफेक्शनच्या सुरुवातीच्या काळात श्वास घेण्यासही त्रास होतो. सोबतच न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होते. अंगदुखीचा त्रास जाणवू लागतो.

*काय काळजी घ्याल?*
झाडावरुन पडलेली आणि खूप पिकलेली फळे खावू नका. या व्हायरसने पिडीत व्यक्तींच्या जवळ जावू नका. खूप ताप येत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या. निपाहच्या रुग्णावर उपचार करताना लागण होऊन केरळमध्ये एका नर्सचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळं निपाहची लागण झालेल्या व्यक्तीच्या जवळ जाणे टाळा.